नागपूर, शासनाद्वारे अनुदानित मध्यान्ह भोजन उपक्रमाला सक्षम करणे आणि शहरातील सार्वजनिक शाळांमधील मुलांना सुरक्षित अन्न व सुधारित पोषण मिळावे हे, उद्दिष्ट ठेवून ‘अक्षय पात्र व शेयर अवर स्ट्रेंथ’ या स्यवंसेवी संस्थेतर्फे लोकवर्गणी व सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी २६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ ते रात्री ११ दरम्यान चिटणीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे प्रायोगिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती समीर बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या आधी हा उपक्रम शहरात राबविला जात होता. आता नव्याने उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याला मध्यान्ह भोजनाचा वार्षिक खर्च २ हजार रूपये येतो. त्यामुळे १५ हजार विद्यार्थांना वर्षाला ३ कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने एका तरी विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन अक्षय पात्र तर्फे केले जात असून स्वयंपाक गृहासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी अक्षय पात्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर व्यंकट, व्योंपाडा दास, जीतेंद्र जोधपूरकर, सचिन जाहगीरदार, राम पळसोडकर, जीतू नायक उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments